← reblecloud
दिनांक

एक पत्र · ५ ऑक्टोबर २०२६

Calendar का, आणि मराठीच का?

प्रत्येक मराठी घरात स्वयंपाकघराच्या भिंतीवर एक calendar असायचं. तारीख बघायला कमी, तिथी, सण आणि दूधवाला कधी येणार नाही हे बघायला जास्त. आणि पानाच्या मागे जे काही छापलेलं असायचं, ते आपण नकळत वाचायचो.

आपली भाषा छोट्या, धारदार म्हणींनी भरलेली आहे. आजी-आजोबा त्या सहज वापरायचे. मग phone आला, भिंतीवरचं calendar गेलं, आणि त्या म्हणी हळूहळू शांत झाल्या.

थेंबे थेंबे तळे साचे

Drop by drop, the lake fills

दिनांक म्हणजे ते पान परत आणायचा एक प्रयत्न. रोज एक म्हण, वाक्प्रचार किंवा संतांची ओळ, तुमच्या home screen वर टांगलेल्या पानावर छापलेली. रोज सकाळी कालचं पान फाडायचं.

हा course नाही. पूर्ण करायचं काही नाही, streak जपायची नाही. फक्त एक पान: त्याचा अर्थ, त्यामागचं चित्र, आणि आज ते वापरायचे तीन मार्ग.

तुम्ही मराठीत वाढला असाल, तर हे घरासारखं वाटेल. आणि मराठी शिकत असाल, तर लोक खरंच बोलतात ते शब्द मिळतील.

दिनांक टीमदिनांक

रोज एक पान. आधी iPhone, लवकरच Android.

ॲपमध्ये काय आहे

iPhone app मधले खरे screens.

Today's page on the blue board
आजचं पान, प्रत्येक शब्दाच्या अर्थासह.
Yesterday's page tearing off the pad
रोज सकाळी कालचं पान फाडायचं.
The pad shrinks and the month opens below it
पॅड लहान करा, कोणताही दिवस उघडा.
Themes and settings under the pad
पाच रंगसंगती. आजीकडे होती तशी निवडा.